बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजाच्या कार्यकाळातील संत होत. रामदास स्वामी हे त्यांचे समकालीन होते. परंतु तुकाराम महाराजाचा पिंड हा समाजसुधारकीचा होता. त्यामुळे आपला व्यवसाय सांभाळून ते समाज प्रबोधन करीत असत. शिक्षणाचा हक्क नाकारला गेला असतानाही समाज जागृतीचे काम ते करीत असत. बहुजनांची लुबाडणूक करण्यासाठी सनातनी ब्राम्हणांनी रुढ केलेल्या अनेक अंधश्रध्देवर तुकाराम महाराजाने हल्ला चढविला. तुकाराम महाराज चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर तुटून पडत.आपल्या अभंगाद्वारे समाजात असलेली विषमतेची दरी कमी करण्याचा प्रयत्न महाराजानी केला. त्यांच्या उपदेशामुळे बहुजन समाजात बंधुभावाचा सलोखा वाढला. देवाचा पगडा बहुजनांच्या डोक्यातून जाणार नाही हे तुकाराम महाराज जाणून होते. म्हणून त्यानी देवाची दलालगिरी करणार्या भटब्राम्हणाकडे आपला मोर्चा वळविला. ढोंगी साधु व मठपतीचा खरपुस समाचार घेतला. तुकाराम महाराज म्हणतात
मुखे सांगे ब्रम्हज्ञान ! जन लोकांची कापीतो मान !
कथा करीती देवाची ! अंतरी आशा बहुलोभाची !
तुका म्हणे तोची वेडा ! त्याचे हाणुनी थोबाड फोडा !
तुकाराम महाराजाची बदनामी करण्यासाठी कारस्थानी लोकानी त्यांच्याकडे वेश्या पाठविल्या होत्या. त्या वेशांचा तुकाराम महाराजानी आदर केला व त्यांना उद्देशून महाराज म्हणाले,
पराचिया नारी रखुमाई समान ! हे गेले नेमुन ठायीये ची !
जाई वो तु माते न करी सायास! आम्ही विष्णुदास नव्हो तैसे !