बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
परशुराम हा आर्य-ब्राम्हणाच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार होय. परशुरामाने या पृथ्वीतलावरील सर्व क्षत्रीयांची 21 वेळा कत्तल केली असे आर्य ब्राम्हणानी आपल्या ग्रंथात नमुद केले आहे.परशुरामाने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. हे विधानच हास्यास्पद आहे. कारण परशुरामाने मारलेली माणसे परत परत जिवंत कशी झाली?. तसेच 20 वेळा मरुन परत जिवंत झालेली माणसे 21 व्या वेळेस एकदमच कसी काय खलास झाली ? 21 वेळा क्षत्रियांना यमसदनी पाठविणार्या परशुरामाचे (दु)र्गुण बघा. हा रेणुका व जमदग्नी यांचा मुलगा. परशुरामाने आपल्या जन्मदात्या आईचा व आपल्या सख्ख्या भावांचा खून केला.