बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
अखिल भारताला काळीमा फासणा-या या सैतानी नरसंहाराचा जगभर निषेध करण्यात आला. नरसंहारामुळे संपुर्ण जगात भारताची बदनामी झाली. भारतातील काही लोकांचे तालीबानी व फॅसीस्ट वृत्तीचे दर्शन संपुर्ण जगाला झाले. महिलांवर बलात्कार व लहान मुळाबाळासह लोकाना अग्नीच्या कुंडात फेकण्यात आले. परंतू या हत्याकांडाला स्फुर्ती देणारे बिनधास्तपणे देशात वावरत असून रोज टी .व्ही व वर्तमानपत्रात झळकत आहेत. अशोक सिंघल व नरेंद्र तोगडीया यानी तर हे हत्याकांड अभिमानास्पद असून याच मार्गावरून हिंदुत्वाचा पुढील प्रवास होईल असे म्हटले आहे. गुजरात मधिल नरसंहारात 2000 पुरुष-स्त्रिया-बालके मरण पावलीत.10 हजार घरेदारे जाळन खाक झालीत. 1.25 लाख लोक विस्थापित झाले व सुमारे 7200 कोटी रुपयाच्या मालमत्तेचा चुराडा झाला. गुजरातेतील हत्याकांडात मारल्या गेलेले मुस्लीम हे मुळातच मुस्लीम नाहीत तर ते आजच्या बहुजन समाजातील ओ.बी.सी.होत. वर्ण व जाती व्यवस्थेच्या कचाट्यात ते फार पिंजले होते. आजच्या बहुजनानी तो ब्राम्हणी अन्याय सहन केला व ते आर्याच्या धर्मवादात अडकून राहीले. परंतु ज्यांना मुस्लिम धर्मातला समभाव व समानता पटली त्यानी ब्राम्हणी व्यवस्था झुगारून मुस्लिम धर्म स्विकारला. म्हणजे आजचे मुस्लिम हे आजच्या बहुजनाचे बंधुच होत. त्यांचे एकमेकाचे रक्तसंबंध आहेत. पण आर्यांचे हिंदू बहुजनाबरोबर कसलेही रक्तसंबंध नाहीत. डी.एन.ए चाचणीने सिध्द झाले आहे की ब्राम्हणांचे रक्त गट हे युरोपीयन लोकांशी मिळते जुळते आहे. ते बहुजनांच्या रक्तसंबंधाचे नाहीत. अमेरीकेतील ऊटाह विद्यापीठातील मायकल बामशाद, तुमस किवीसिल्ड, डब्लु स्कॉट व आनुवांशीक विभाग, आंध्रा विद्यापीठ यानी सयुंक्तपणे भारतातील वेगवेगळ्या जातीचे रक्त नमुने घेऊन अमेरीकेत या रक्तगटावर संशोधन करण्यात येऊन Genetic Evidence on the Origins of Indian Caste Population (Vol.II,Issue 6, 994-1004, June 2001) हा पेपर प्रकाशित करण्यात आला. सदर संशोधन ईंटरनेट वर सुध्दा बघायला मिळते.
गुजरातेत झालेल्या दंगलीत आदिवासीचा व दलितांचा सैनिक म्हणुन वापर झाला परंतु याच दलिताना समाज जीवनात भेदभावाची वागणूक मिळत आहे. सवर्ण वस्तीत दलितांना राहायला भाड्याने जागाही मिळत नाही. घर भाड्याने देतेवेळी सर्रास जात विचारली जाते. यालाच हिंदुत्ववाद म्हणायचे काय?. गुजरात दंगली नंतर विश्व हिंदु परीषदेची 'दलितांना खुली धमकी' अशी बातमी लोकसत्ता (दि.17/03/2003) या वृत्तपत्रात प्रसिध्द झाली. या वृत्तानुसार आता तुम्हालाही मुस्लीमांप्रमाणे धडा शिकवावा लागेल अशी धमकी देऊन 'हरीजनांनो' लक्षात ठेवा, कि तुम्हालादेखील या देशाच्या मातीत मिसळण्याची मुभा मिळणार नाही. आता आमचा काळ सुरु झाला आहे. असी दर्पोक्ती युक्त धमकी देण्यात आली होती.
दलित-आदिवासी द्वारा मुस्लिमाचे शिरकान करण्यात आल्यानांतर विश्वहिंदु परीषदेने दलिताना 'तुम्हालाही मुस्लिमाप्रमाणे धडा शिकवावा लागेल' असी धमकी देउन ‘बनासकाठा' दलित संघटनेला पत्र देण्यात आले. पत्रानुसार आता हिंदुत्व जागृत झाले असुन आंबेडकरवाद्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. यावेळी मिया (मुस्लीम) देखील तुमच्या मदतीला येणार नाहीत. या पत्रावरुन विश्व हिंदु परीषद व बजरंग दलाने आपला मोर्चा दलितांकडे वळविला आहे हे स्पष्ट होते. दलिताविरुध्द सैनिक म्हणून ओ.बी.सी चा वापर करण्यात येईल हे स्पष्ट आहे. विश्व हिंदु परीषदेचा मायबाप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्यामुळे त्यांच्या पिलावळीकडून निघणारे विषारी बाण संघाच्याच व्युहनितीतून सुटत असतात. हे बाण येथील बहुजन व दलितांची घरे उध्वस्त करतील एवढी ताकदवर आहेत.संघाकडे ताकतीची सर्व साधने ऊपलब्ध आहेत. त्यामुळे विहिंपने दिलेली धमकी पोकळ समजण्याचे कारण नाही. बहुजन समाजाने संघाच्या या पिलावळीचे कारस्थान लक्षात घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे.