बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
शेकडो भाकडकथा रचून बहुजन समाजाला अंधश्रध्दात बुडवून ठेवण्याचे अघोरी कृत्य करण्याचे कार्य ब्राम्हण समाज करीत आहे. बहुजन समाजाला अंधश्रध्देत गुंतवून ठेवण्यासाठी देव व धर्माचा अधिकाधीक वापर करीत आहेत. शुभ-अशुभ, स्वर्ग-नरक, आत्मा व मोक्ष इत्यादी बाबीची भिती बहजन समाजाला दाखविण्यात येते. कुणाच्या दारिद्र्याचा, रोगाचा व व्यंगाचा संबंध पुर्व जन्मात केलेल्या पापाशी लावतात.आज देव-धर्म, पुजा-पाठ , यज्ञ, सत्संग या गोष्टींनी थैमान घातले आहे. बहुजन समाजावर याचा फार मोठा प्रभाव पडत आहे. बहुजन समाजातील माणसे हे रोज सकाळी व संध्याकाळी देवाची दोन दोन तास पुजा करतात. एवढेच नव्हे तर लोकल ट्रेन मध्ये हनुमान चालीसा, तुलसी चालीसा, शिव चालीसा खिशातून काढुन मनातल्या मनात पुटपुटत असतात. काही जण तर दुसर्याला त्रास होईल एवढे बडबडत असतात. जे आपला जास्तीत जास्त वेळ पुजा पाठात देतात. ते आपल्या मुलांच्या अभ्यासात वेळच देऊ शकत नाही. मुलांचे भवितव्य त्यांनी देवावर सोडलेले असते. अशांची मुले केवळ चपरासी किवा गोदीमध्ये काम करणारा कामगारच बनू शकतात. ते आपल्या मुलांना डॉक्टर, ऑफीसर बनवू शकत नाहीत. आणी हेच तर ब्राम्हणवाद्यांना हवे आहे. तुमची मुले शिकली, ऑफीसर, न्यायाधीश बनली तर त्यांची मुले कुठे जातील?. त्यामुळेच बहुजन समाजाला जास्तीत जास्त देवांच्या नादी लावीत आहेत. ब्राम्हण हे आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करीत असतात. त्यांच्या सोबत स्पर्धेत टिकण्याची तुमची कुवत हिरावून घेतल्या जाते.बहुजन समाज अंधश्रध्देत गुरफुटून राहीला तर शासन कर्त्या समाजाला ती पर्वणीच ठरते. कारण असा समाज होयबा म्हणूनच वावरत असतो.
समाजातील अत्यंत मोठा भाग देवांच्या मुढ कल्पणात गळुन गेल्यामुळे काही आपमतलबी माणसे आपला कावा साधतात. जगात इश्वर असो वा नसो त्याचा विचार करण्याची आज गरज नाही.जगात ज्या घडामोडी घडत असतात त्यामागे माणुस काम करीत असतो. नैसर्गीक आपत्ती यायला भुगर्भाच्या बाह्य व आंतरंगीय कार्यकरण भाव जबाबदार असतो. त्यामागे कोणतिही दैवी शक्ती काम करीत नसते. परंतु तथाकथीत धर्माचे दलाल याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले हित साधतात.दैवी कोपामुळे हे झाले असे ते सांगतात, यातून ते आपले अर्थशास्त्र पक्के करीत असतात. आजचा बहुजन समाज मेंढरासारखा ढोंगी साधुच्या भजनी लागला आहे मात्र स्वत:च्या विकासाच्या कोणत्याही आयोजनात तो कधीही ढुंकुन बघत नाही.