संभाजी व शिवाजी महाराजामध्ये कलह झाला असला तरी 22-11-1679 रोजी पन्हाळगडावर त्यांची दिलजमाई झाली होती. त्यामळे शिवाजी महाराजाच्या आजारपणात संभाजी महाराजाला बोलाविले असते. परंतु शिवाजी महाराजाचा मृत्यु झाल्यानंतरही संभाजी महाराजाला न बोलविता 18 दिवसानी 21-4-1680 ला राजारामाचे राज्यरोहण करुन संभाजी महाराजाला पकडण्यासाठी पन्हाळगडाकडे कुच करण्यात आली. सरकारकुनानी शिवाजी महाराजावर विष प्रयोग केला त्यात सोयराबाई सामील होती असे काही इतिहासकार म्हणतात. मल्हार रामरावच्या बखरीत संभाजी महाराजाने रायगडावर येताच सोयराबाईने शिवाजी महाराजावर विषप्रयोग केल्याचा आरोप करुण तिला भिंतीत दाबुन मारल्याचे म्हटले आहे. मे-सप्टेम्बर 1689 च्या डच अहवालात शिवाजी महाराजाला त्याच्या दुसर्या बायकोकडून विषप्रयोग झाला असे म्हटले आहे. यातून निष्कर्ष एकच निघतो शिवाजी महाराजानी मोठ्या युक्तीनी कमावलेले राज्य स्त्रियांच्या माध्यमातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न भट ब्राम्हण करीत होते. संभाजी महाराजाकडे राज्याची फाळणी करण्याचा प्रस्ताव प्रल्हाद निराजी द्वारा पाठविला होता यावरुन ब्राम्हण किती स्वराज्य द्रोही होते हे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजाला पकडून देणारा कलुषी कब्जी हा ब्राम्हण होता. फ्रेंच वखारीचा गव्हर्नर मार्टीन याने मार्च 1689 मध्ये केलेल्या रोजनिशी नोंदीत ब्राम्हण कारभार्यांनी संभाजी महाराजास पकडून दिले असे म्हटले आहे.